एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात मविआ सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. ४० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गेल्या आठवड्यात या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. दरम्यान, या नव्यानं स्थापन झालेल्या सरकारबाबत एक मोठी बाब समोर आली आहे. शिंदे फडणवीस सरकारमधील तब्बल 75 टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.